मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:40 AM2017-12-07T00:40:02+5:302017-12-07T00:40:16+5:30

धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे.

Another arrested in the illegal miscarriage center case in Motala taluka! | मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक!

मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात केंद्र प्रकरणात आणखी एकास अटक!

Next
ठळक मुद्देआज न्यायालयात हजर करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे (बुलडाणा): बेकायदेशीर गर्भपात होत असल्याच्या संशयावरून मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर शनिवारी झालेल्या कारवाई प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्यांपैकी आणखी एकास धामणगाव बढे पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांना बेकायदेशीरपणे एमटीपी किट पुरविण्याचा आरोप असलेल्या कैलास सरादे (रा. पोटा, ता. नांदुरा) यास पोलिसांनी ६ डिसेंबर रोजी अटक केली. दरम्यान, प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. संदीप क्षीरसागर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची मोताळा न्यायालयाने वाढ केली आहे.
२ डिसेंबर रोजी रोहिणखेड येथील क्षीरसागर हॉस्पिटलवर मध्यरात्री जिल्हा शल्यचिकित्सक सरिता पाटील यांनी कारवाई केली होती. या प्रकरणात तीन डिसेंबर रोजी डॉ. संदीप क्षीरसागरसह डॉ. विश्‍वास, डॉ.गौरी क्षीरसागर आणि कैलास सरोदेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 
डॉ. क्षीरसागर यांना अटक केली असता न्यायालयाने त्याची ६ डिसेंबरपर्र्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. बुधवारी त्याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 
दुसरीकडे एमटीपी किट डॉक्टरांना पुरविण्याचा आरोप असलेल्या कैलास सरोदे यास त्याच्या नांदुरा तालुक्यातील पोटा गावातून शोधून काढत पोलिसांनी अटक केली.   बुधवारी सायंकाळी त्यास अटक करण्यात आली असून, गुरूवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Web Title: Another arrested in the illegal miscarriage center case in Motala taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.