आणखी चाैघांचा मृत्यू, ५०६ नवे पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:14+5:302021-03-23T04:37:14+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ५०६ जणांचा काेराेना ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ५०६ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून १२९५ काेरेाना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ५९४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान काँग्रेस नगर, बुलडाणा येथील ७० वर्षीय पुरुष, शाहू नगर चिखली येथील ७८ वर्षीय पुरुष, सावळा ता. मेहकर येथील ७४ वर्षीय पुरुष, गोकुळ धाम, मलकापूर येथील ६७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ३५, बुलडाणा तालुका देऊळघाट १, धाड २, माळवंडी २ , माळविहीर १, येळगाव १, जनुना २, पाडळी २, साखळी बु. ३, रायपूर १, मासरुळ १, हतेडी १, खामगाव शहर ५९, खामगाव तालुका टेंभुर्ण १, पि. राजा १, पळशी २, सुटाळा ५, अंत्रज १, ढेरपगाव १, शेलोडी १, विहीगाव १, हिंगणा करेगाव २, गोंधणपूर १, नांदुरा तालुका खैरा ९, धानोरा १, टाकळी १, मलकापूर शहर ११२, मलकापूर तालुका दाताळा २, भाडगणी २, बेलाड १, नरवेल १, लासुरा १, मोरखेड १, निमखेड १, आळंद १, जांबुळ धाबा १, खामखेड १, चिखली शहर १७, चिखली तालुका अमडापूर २, मेरा बु. ३, हातनी २, पेन सावंगी १, शेलूद १, उंद्री १, भरोसा १, कोलारा १, आंधाई १, किन्ही सवडत १, धोडप १, सिं. राजा शहर ७, सिं. राजा तालुका दुसरबिड १, आडगाव राजा १, वाघरी १, पळसखेड चक्का १, पिंपळगांव लेंडी १, अंचली २, उमरद १, बेलोरा १, साखरखेर्डा २१, बळसमुद्र २, गुंज २, राहेरी १, केशव शिवणी १, मोताळा तालुका खडकी १, बोराखेडी २, संगळाद १, गुलभेली २, पुन्हाई १, लोन घाट १ उबाळखेड १, दाभा १, घुस्सर १, पि. देवी १, मोताळा शहर ५, शेगाव शहर ३४, शेगाव तालुका माटरगाव १, चिंचोली २, शिरसगाव १, पहूरजिरा १, गौलखेड १, तिव्हण १, संग्रामपूर तालुका सोनाला १, वरवट खंडेराव २, जळगाव जामोद शहर ८, जळगाव जामोद तालुका आसलगाव ९, सावरगाव ९, वडोदा १, जामोद ४, पळशी सुपो ५, मडाखेड १, अकोला खुर्द १, वडगाव १, दे. राजा शहर १२, दे. राजा तालुका अंढेरा १७, दे. मही १, सिनगाव जहा १, जवळखेड १, खल्याळ गव्हाण १, लोणार शहर ३, लोणार तालुका बिबी ५, खंडाळा १, शारा १, पांग्रा १, देऊळगाव १, पळसखेड १, मेहकर शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम १, कळप विहीर १, नायगांव १, आंध्रूड १, पोखरी १, भालेगाव १, नांदुरा शहर ६ आदींचा समावेश आहे.
२४० जणांचा मृत्यू
आज रोजी ४ हजार १४५ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३० हजार ६१३ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी २५ हजार ०८ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार ३६५४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २४० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.