बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:59 AM2021-03-01T11:59:01+5:302021-03-01T11:59:33+5:30

CoronaVirus News बुलडाणा शहरातील रामनगर भागातील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला.

Another death in Buldana district; 340 corona positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ३४० कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३,६०० अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले  असून, ३,२६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दुसरीकडे बुलडाणा शहरातील रामनगर भागातील एका ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मलकापूर नऊ, माकनेर एक, दाताळा एक, चिखली ११, शेलूद एक, पळसकेड दौलत दोन, देऊळगावराजा १८, अंढेरा चार, वाकी दोन, सावंगी टेकाळे चार, सातेफळ एक, देऊळगाव मही एक, सिनगाव जहागीर चार, आळंद चार, बुलडाणा ४१,  सागवन दोन, सुंदरखेड एक, शिरपूर १, अंभोडा सहा, माळविहीर एक, धाड एक, मोताळा एक, गुळबेली एक, जळगाव जामोद सात, झाडेगाव सात, धानोरा एक, आसलगाव दोन, कुरणगड १२, खामगाव २५, घाटपुरी चार, निरोड चार, उमरा अटाळी दोन, विहीगाव दोन, रोहणा एक, पिंपळगाव राजा एक, हिवरखेड २१, शिरला नेमाने एक, शेगाव ३०, भोनगाव एक, अळसना एक, जानोरी नऊ, टाकली विरो तीन, तरोडा कसबा एक, सिंदखेड राजा तीन, साखरखेर्डा एक, किनगाव राजा एक, हिरडव दोन, सुलतानपूर दोन, जानेफळ ११, दुधा एक, मोळा एक, निबंका एक, कल्याण एक, हिवरा साबळे चार, गजरखेड सहा, डोणगाव एक, पेनसावंगी दोन, देऊळगाव माळी पाच, घाटबोरी एक, कळमेश्वर एक, मेहकर १४, नांदुरा २०, वाडी दोन, तरवाडी एक, तांदुळवाडी दोन आणि जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एक, वाशिम येथील एका बाधिताचा यात समावेश आहे. दरम्यान, बुलडाणा शहरातील रामनगरमधील ६० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे शनिवारी मृत्यू झाला. दोन दिवसानंतर एखाद्या कोरोना बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे रविवारी २८४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख ३६ हजार ८३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोबतच १५,७७६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 

Web Title: Another death in Buldana district; 340 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.