बुलडाणा जिल्ह्यातआणखी दाेघांचा मृत्यू, ५२ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:24 AM2021-01-21T11:24:06+5:302021-01-21T11:24:16+5:30

CoronaVirus News शेगांव येथील ८३ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Another death in Buldana district, 52 positive | बुलडाणा जिल्ह्यातआणखी दाेघांचा मृत्यू, ५२ पाॅझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यातआणखी दाेघांचा मृत्यू, ५२ पाॅझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा  : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला आहे, तसेच ५२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, २४ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान शेगांव येथील ८३ वर्षीय पुरुष व मलकापूर येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६४८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५९६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.  
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहरातील पाच, खामगांव तालुका  घाटपुरी १, पळशी २,  बुलडाणा शहरातील १८, दे.राजा शहरातील दाेन, शेगांव शहरतील १०, सिं.राजा शहर १, सि.राजा तालुका जाडेगांव १, सायळा २, मलकापूर तालुका बेलाड ४, दुधलगांव बु १, हरणखेड २,  नांदुरा तालुका खेडगांव १, चिखली तालुका  वडती येथील एका समावेश आहे, तसेच काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, बुलडाणा अपंग विद्यालय ११, सिं.राजा ०१, खामगांव ०४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. 
तसेच आजपर्यंत ९८ हजार १६६  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे, आजपर्यंत १२ हजार ९१९  कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे, तसेच ८८३ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत.  जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४७७   कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ३१९ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात ३९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत

Web Title: Another death in Buldana district, 52 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.