बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ८०२ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:30 AM2021-03-22T11:30:32+5:302021-03-22T11:30:53+5:30
Coronavirus News ३,२४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ८०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ४५७ झाली असून दिवसेंदिवस सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, रविवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी ४०४७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३,२४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ८०२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यासोबतच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा १११, माळवंडी १०, जनुना ११, खामगाव ६६, टेंभुर्णा ५, भंडारी ६, शिरसोळी ३०, बरफगाव ७, विटाळी ६, मलकापूर ६७, आळंद ५, कुंड खु. ९, चिखली ४३, पेठ १०, अमडापूर ४, मेरा बु. १०, सिं. राजा १७, धा. बढे ९, मोताळा १८, शेगाव ३५, वानखेड ५, दुर्गादैत्य ६, जळगाव जामोद ६, आसलगाव ५, उमापूर १८, दे. राजा १४, बिबी १०, मेहकर ८, सावळा ७, ब्रह्मपुरी ५, लोणी गवळी ५, नांदुरा १५, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एक, अकोला जिल्ह्यातील लोहारा १, जळगाव जिल्ह्यातील रावेर १, जळगाव १, नागपूर १ आणि अमरावतीमधील एकाचा समावेश आहे. सुंदरखेड येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.