बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ९१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:45 PM2021-02-14T12:45:32+5:302021-02-14T12:46:07+5:30

CoronaVirus News मोताळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Another death in Buldana district; 91 positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ९१ पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू; ९१ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४७८ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८७ अहवाल निगेटिव्ह आले असून, ९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मोताळा येथील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १७६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये चिखली १४, चांधई एक, सवणा दोन, बोरगाव एक, धानोरी एक, देऊळगाव राजा एक, पिंपळखुटा दोन, मलकापूर पांग्रा एक, अंजनी एक, लोणार पाच, येळगाव एक, डोंगर खंडाळा एक, धामणगाव एक, टाकळी एक, भादोला एक, बुलडाणा  २३, जळगाव जामोद एक, वाडी चार, सुनगाव एक,  खामगाव चार, मलकापूर नऊ, दाताळा एक, घिर्णी एक, हरसोडा एक, शेगाव सहा, जवळपा तीन, तळणी एक, सोनाळा एक आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हत्ता येथील एकाचा समावेश आहे.  
दुसरीकडे  मोताळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Web Title: Another death in Buldana district; 91 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.