बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:16 PM2021-02-17T12:16:07+5:302021-02-17T12:16:21+5:30

CoronaVirus In Buldhana जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Another died by corona in Buldana district; 82 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; ८२ जण पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४३० जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले.  त्यापैकी ३४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ८२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका ५५ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ३७, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, दहीद येथील एक, चांडोळ येथील एक, हिवरा येथील एक, अमडापूर येथील एक, धोत्रा भणगोजी येथील एक, हातणी येथील एक, चिखली येथील ११,  देऊळगाव राजा  एक, सिनगाव जहागीर दोन, देऊळगाव मही एक, लोणार चार, सिंदखेड राजा दोन, रुम्हणा एक, शेंदुर्जन एक, मेहकर शहर चार, गुंधा एक, मुंदेफळ एक, डोणगाव दोन, नांदुरा  एक, झाडेगाव एक आणि अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील एक, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील दोन जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. असा प्रकारे ८२ जण मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुसरीकडे उपचारादरम्यान मेहकर तालुक्यातील अंजनी खुर्द येथील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत ७६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 
यासोबतच जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १ लाख १५ हजार ९५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १४ हजार २२१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोना मृत्यूदरही आता वाढत असून ११ टक्क्यावरून तो १२ वर पाहोचला आहे.

Web Title: Another died by corona in Buldana district; 82 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.