बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मत्यू, ३२१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 12:01 PM2021-03-04T12:01:41+5:302021-03-04T12:02:08+5:30

coronavirus news मेहकर येथील ५४ वर्षीय कोरोना बाधीताचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.

Another dies in Buldana district, 321 corona positive |  बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मत्यू, ३२१ कोरोना पॉझिटिव्ह

 बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मत्यू, ३२१ कोरोना पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २,३१० जणांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यापैकी १९८९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर  ३२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मेहकर येथील ५४ वर्षीय कोरोना बाधीताचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या आता १९५ झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा येथील ३५, दुधा येथील एक, सुंदरखेड येथील एक, गिरडा येथील एक, वरवंड येथील सात, उमाळा एक, डोंगर खंडाळा येथील दोन, दहीद बुद्रूक येथील तीन, रायपूर येथील दोन, मढ येथील दोन, सागवन एक, भालगाव दोन, सवणा चार, केळवद एक, वळती चार, भरोसा दोन, शेलूद एक आमखेड तीन, हातणी दोन, माळशेंबा एक, मंगरूळ ेक, बेराळा दोन, टाकरखेड हेलगा सहा, देऊळगाव धनगर एक, खंडाळा दोन, वरूड एक, चिखली १२, सि. राजा सात, साखरखेर्डा तीन, खरबडी एक, शेलापूर एक, खामगाव १५, गोंधनापूर तीन, जयपुर लांडे एक, अंत्रज १९, उमरा चार, शिरलाोक, देऊळगाव राजा तीन, देऊळगाव मही एक, उंबरखेड एक, अंढेरा तीन, बायगाव एक, सुरा दोन, धोत्रा नंदई एक, मेहकर २२, जानेफळ २७, डोणगाव तीन, शहापूर दोन, थार एक, कळमेश्वर दोन, मलकापूर ३४, विवरा एक, उमाळी एक, नांदुरा १६, पोटळी एक, पातोंडा दोन, आलमपूर एक, चांदुरबिस्वा पाच, खैरा एक, हिरडव दोन, लोणार तीन, वडशिंगी एक, खांडवी एक, जळगाव जामोद एक, शेगाव २०, भोनगाव एक, जलंब एक, मोताळा एक, जळगाव खान्देश जिल्ह्यातील भुसावळ येथील एकाचा समावेश आहे. दरम्यान मेहकर येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी २९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Another dies in Buldana district, 321 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.