चांदुर बिस्वा येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:58 PM2020-05-25T21:58:54+5:302020-05-25T22:00:03+5:30
चांदुर बिस्वा येथील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क नांदुरा : पुण्यावरून प्रवास करून चांदुरबिस्वा येथे पोहोचलेल्या कुटुंबांपैकी एक सदस्य कोरोना बाधित असल्याचे निदान झाले होते. त्या कुटुंबातील आठ सदस्यांवर बुलडाणा येथे उपचार सुरू असताना त्यापैकी एका सदस्याचा रिपोर्ट २५ ला पॉझिटिव्ह आल्याने आता चांदुर बिस्वा येथे दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापूर्वी अलमपूर येथे एक रुग्ण आढळल्याने तालुक्यात रुग्ण संख्या तीन झाली आहे. जळगाव जामोद येथे पुण्याहून १६ मे रोजी आलेल्या व्यक्तीची तब्बेत अचानक खालावल्याने त्यास सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या संशयितरित्या मृत्यू पावलेल्या रुग्णाला कोरोना झाल्याचे निदान झाले होते. सदर मृतक व्यक्तीच्या प्रवासाचा इतिहास बघता या कोरोना बाधित मृतक व्यक्ती सोबत पुण्याहून १६ मे रोजी जळगावाला प्रवासी जीपने आला होता. त्यात नांदुरा शहरातील एक तालुक्यातील चांदुरबिस्वा येथील चालक व इतर सहा असे सात व मलकापूर शहरातील एक व्यक्ती आले. त्या कोरोन बाधित मृतकासोबत पुणे ते नांदुरा प्रवास केलेल्या तालुक्यातील आठ व मलकापुरातील एकाला क्वारंटाइन करून बुलडाणा येथे उपचार करिता व कोरोना चाचणीचा तपासणी करता पाठविण्यात आले होते. मुळच्या चांदूरबिस्वा येथील लोकांनी पुण्यावरून गावाकडे येण्याकरिता एक जीपगाडी केली होती. त्यामध्ये नांदुरा शहरातील एका नागरिकाचाही समावेश होता. दरम्यान प्रवासी जीपगाडील नागरिकांनी एका व्यक्तीस वाघोली पुणे येथून आपल्या सोबत लिफ्ट देऊन बसवून घेतले होते व सोबत पुणे ते नांदुरा प्रवास केला होता. २५ मे रोजी प्राप्त अहवालामध्ये त्याच्या कुटुंबातील पुन्हा एका सदस्याला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. आता चांदुर बिस्वा येथे दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून यापूर्वी अलमपूर येथे एक रुग्ण आढळल्याने तालुक्यात रुग्णसंख्या तीन झाली आहे .