नगर पालिका घंटागाडी कामगारांचे पुन्हा कामबंद आंदोलन; कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

By अनिल गवई | Published: December 1, 2023 01:39 PM2023-12-01T13:39:18+5:302023-12-01T13:40:33+5:30

कुटुंबासह पालिकेसमोर ठिय्या आंदाेलनाचा इशारा

Another strike by Municipal Clock Tower workers; Ignoring various demands of workers | नगर पालिका घंटागाडी कामगारांचे पुन्हा कामबंद आंदोलन; कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

नगर पालिका घंटागाडी कामगारांचे पुन्हा कामबंद आंदोलन; कामगारांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

खामगाव: स्थानिक नगर पालिका प्रशासनातंर्गत १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घंटागाडीवरील २६ कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने शुक्रवारपासून घंटागाडी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरूवात केली आहे.

उपेक्षित दलित सामाजिक परिषद व महाराष्ट्र नव निर्माण कामगार सेनेच्यावतीने पुकारलेल्या कामबंद आंदोलनात नगर पालिकेतंर्गत सर्वच घंटागाडी कामगार आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शहरातील कचरा उचल, हाताळणूक आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. घंटागाडी कामगारांच्या विविध समस्यांकडे नगर पालिका प्रशासनाकडून सुरूवातीपासूनच अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे.

दरम्यान, गत काही दिवसांपासून १३ घंटागाडी बंद करण्यात आल्याने २६ कामगार आणि त्यांच्या कुटुंिबयांवर उपासमारीची वेळ आली असून १ डिसेंबरपासून घंटागाडी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरूवात केली आहे. २ िडसेंबरपासून या कामगारांनी कुटुंबियांसह नगर पालिकेसमोर ठिय्या आंदोलनाचाही इशारा दिला आहे. यासंदर्भात नगर पालिका प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनावर कन्हैया सारसर आणि विनोद इंगळे यांची स्वाक्षरी आहे.

Web Title: Another strike by Municipal Clock Tower workers; Ignoring various demands of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.