बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ४५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 05:30 PM2021-02-07T17:30:42+5:302021-02-07T17:30:51+5:30
Coronavirus News कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता १७२ झाली आहे.
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २९२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २४७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, चिखली येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी, कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या आता १७२ झाली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये सिंदखेड राजा दोन, रायपूर एक, बुलडाणा नऊ, देऊळगाव राजा ९, देऊळगाव मही तीन, शेगाव तीन, जवळपा एक, इटखेड एक, कारखेड एक, घाटपुरी एक, खामगाव पाच, मलकापूर दोन, जांभूळ धाबा दोन, दाताळा दोन, पिंपळगाव काळे एक, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान, चिखली येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ६९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यात चिखली कोविड केअर सेंटरमधील २२, देऊळगाव राजा येथील दोन, खामगाव येथील १७, बुलडाणा येथून १६, शेगाव चार, जळगाव जामोदमधून एक, संग्रामपूरमधून एक आणि मलकापूर कोविड केअर सेंटरमधील पाच जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एक लाख १२ हजार ४०२ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर कोरोनाबाधितांपैकी १३ हजार ८०५ बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
१०३८ संदिग्धांच्या अहवालांची प्रतीक्षा
तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालापैकी अद्यापही १०३८ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४ हजार ३१९ झाली असून यापैकी सक्रिय रुग्ण असलेल्या ३४२ जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे १७२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.