अनुराधा अभियांत्रिकीचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:48+5:302021-02-26T04:47:48+5:30

विद्यापीठाने जाहीर केलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या गुणवत्ता यादीत अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अश्विनी गुजर ५वी मेरीट, गौरव भाकरे ७वा मेरीट, ...

Anuradha Engineering students in the university's merit list | अनुराधा अभियांत्रिकीचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अनुराधा अभियांत्रिकीचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

Next

विद्यापीठाने जाहीर केलेल्या अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाच्या गुणवत्ता यादीत अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अश्विनी गुजर ५वी मेरीट, गौरव भाकरे ७वा मेरीट, तर सुजाता जाधव १०वी मेरीट आली आहे. महाविद्यालयाचे ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी विदेशात नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे देशाअंतर्गत ४ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत असून, यातील अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी, सरकारी अधिकारी म्हणून सेवारत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग उभारून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, गुणवत्ता यादीत टॉप टेनमध्ये आपले स्थान निश्चित करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या गौरवात आणखी भर घातली असल्याचे कौतुकोद्गार प. रा. मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काढले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण. एन. नन्हई यांनी विद्यार्थ्यांचे काैतुक केले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सिध्दविनायक बोंद्रे, सचिव राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही. आर. यादव, विश्वस्त नानासाहेब सराफ, सलीमोद्दीन काझी, सिध्देश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, प्राचार्य डॉ. अरूण नन्हई, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Anuradha Engineering students in the university's merit list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.