'जीपॅट' परीक्षेत अनुराधा फार्मसीचे यश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:36 AM2021-03-23T04:36:26+5:302021-03-23T04:36:26+5:30

चिखली : अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील नामांकित ''''जीपॅट'''' स्पर्धा परिक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून ...

Anuradha Pharmacy's success in 'GPAT' exam! | 'जीपॅट' परीक्षेत अनुराधा फार्मसीचे यश !

'जीपॅट' परीक्षेत अनुराधा फार्मसीचे यश !

Next

चिखली : अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसीच्या तब्बल ३५ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील नामांकित ''''जीपॅट'''' स्पर्धा परिक्षेत दैदीप्यमान यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परिक्षेचा निकाल १९ मार्च रोजी जाहीर झाला आहे.

एम.फार्म व पीएच.डी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर एन.टी.ए.मार्फत जी-पॅट स्पर्धा परिक्षा घेतली जाते. यावर्षी संपूर्ण भारतातून ३५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे ४ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये एकट्या अनुराधा फार्मसी महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अमोल सातपुते, ज्ञानेश्वर ढोले, आकाश शेळके, सैय्यद नदीम, दीपक काळे, मनिष तायडे, ऋषिकेष सुरडकर, बळीराम भुतेकर, गणेश कुटे, मंगेश गाडेकर, विशाल पिंपळे, विशाखा गवई, गोपाल खोडवे, वैभव जंजाळ, गंगाधर शिंदे, ओम कापसे, केशव ताठे, सुुरज ठाकरे, जयेश मसने, तुषार जाधव, शिवदर्शन निकस, अंकिता महाडीक, शुभम जाधव, संतोष जायभाये, शितल पोहरे, चंदन सरकटे, सुजाता साळवे, कनक भोजने, प्रतिक्षा मोरे, आरती भिलावेकर, निशांत मान्टे, योगेश्वर अल्हाट, अंकिता गिऱ्हे, शुभम सुरडकर व कमलेश केंद्रे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गत वर्षी महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी ३५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळविल्याने महाविद्यालयाचा या परीक्षेत यशस्वीतेचा आलेख दरवर्षी वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर.बियाणी होते. तर प्राचार्य डॉ.आर.एच.काळे, प्राचार्य डॉ.आर.आर.पागोरे, प्रा.यू.एम.जोशी, प्रा.एस.एस.कुळकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये जीपॅट उत्तीर्ण विद्यार्थी, प्राचार्य व प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Anuradha Pharmacy's success in 'GPAT' exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.