कोरोनाची भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:41+5:302021-05-04T04:15:41+5:30

कोरोनाच्या आलेल्या पहिल्या लाटेमध्ये साधारण साठ वर्षांच्यावरील व्यक्तीचा मृत्यू झाला होता; पण आता आलेली ही दुसरी लाट अनेकांचे बळी ...

Appeal to get vaccinated without fear of corona | कोरोनाची भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन

कोरोनाची भीती न बाळगता लस घेण्याचे आवाहन

googlenewsNext

कोरोनाच्या आलेल्या पहिल्या लाटेमध्ये साधारण साठ वर्षांच्यावरील व्यक्तीचा मृत्यू झाला होता; पण आता आलेली ही दुसरी लाट अनेकांचे बळी घेत आहे. यामध्ये तरुण व्यक्ती तसेच लहान मुले यांनाही कोरोनाची लागण होऊन यामध्ये त्यांचा मृत्यू होत आहे. यासाठी सर्वांनी शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे फार जरुरी आहे. खोकला, सर्दी झाले तर लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे व प्रथमोपचार करून घ्यावा, त्याचप्रमाणे कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या समाज बांधवांमध्ये लसीकरणाबद्दल असलेला गैरसमज दूर करणे हा आहे. त्याचप्रमाणे आपण घरीच राहून कोरोनापासून आपला बचाव करू शकतो. आपणाला कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून नगर परिषदेचे तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद आपल्या आरोग्याची काळजी न करता आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यासाठी आपणही त्यांना चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन कासम गवळी यांनी या बैठकीत केले. यावेळी जिल्हा मुस्लीम कोअर कमिटीचे पदाधिकारी डॉ. अस्लम खान शेगाव, फिरोझ खान शेगाव, बादशहा खान, डॉ. इसरार जमादार, रियाझ शेख, अब्दुल राजीकभाई, कदिर कुरेशी, जलील शेख, रशीद खा जमादार मलकापूर, आसिफ ठेकेदार, कमर अफजल खान, सय्यद साजिद मानस गाव, इनायत खान, अन्वर निसार जामदार, मो. सईद अन्सारी, सय्यद बिलाल भाई, शेख नबिल, तौसिफ शेख, शेख असगर, सलमान शेख, मो. हाफिज मेहकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून सर्व समाज बांधवांना कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले. ॲड. शहजाद खान लाखनवाडा यांनी आभार मानले.

Web Title: Appeal to get vaccinated without fear of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.