स्वतःकडील बियाणे वापरण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:31+5:302021-02-26T04:48:31+5:30
सागवन येथे सहा रुग्ण बुलडाणा : तालुक्यातील सागवन येथे कोरोनाचे सहा रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती ...
सागवन येथे सहा रुग्ण
बुलडाणा : तालुक्यातील सागवन येथे कोरोनाचे सहा रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गृहभेटी
हिवरा आश्रम : विवेकानंदनगर येथील जिल्हा परिषद शाळेत कोरोनाकाळात शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक वर्गाचे व्हाॅट्स-ॲप ग्रुप तयार करून त्यावर नियमितपणे अभ्यास देणे चालू आहे. गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कर्ज परतफेड योजनेला ३१ मार्चची मुदत
बुलडाणा : भूविकास बँकेच्या थकीत कर्जदार सभासदांसाठी शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत आहे. थकीत कर्जाचा भरणा करून योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेती साहित्यावर चोरट्यांचा डोळा
डोणगाव : शेती साहित्यांवर चोरट्यांची नजर आहे. काही दिवसांपूर्वी गोहोगाव रोडलगतच्या एका शेतातून चोरट्यांनी स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यामुळे डोणगाव परिसरात चोरटे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
रस्ता दुभाजक देतो अपघाताला निमंत्रण
मोताळा : येथून मलकापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने दुभाजक बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एसटी प्रवाशांची संख्या पुन्हा घटली
बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामधून दररोज २३८ बसफेऱ्या धावतात. त्यामधून दिवसाला ३० हजार प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत. कोरोनामुळे या प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांचे गणवेश वाटप रखडले
सिंदेखड राजा : प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपाचा प्रश्नही रखडला आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा आहे.