डोणगाव येथे १७ सदस्यांसाठी ९६ उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:28+5:302021-01-03T04:34:28+5:30
डोणगाव येथील कोणतीही निवडणूक असो ती चुरशीची होते. या ठिकाणी एकीकडे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे गाव तर दुसरीकडे ...
डोणगाव येथील कोणतीही निवडणूक असो ती चुरशीची होते. या ठिकाणी एकीकडे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे गाव तर दुसरीकडे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची कर्मभूमी असा डोणगावचा राजकीय वारसा आहे. तेव्हा येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असते. वॉर्ड क्रमांक एकमधील (ओबीसी) महिलांचा मागास प्रवर्गात प्रतिस्पर्धी उरलेला नाही. इतर १६ सदस्यांसाठी ९६ उमेदवारांनी अर्ज भरले. त्यापैकी मैदानात किती उतरतील हे येत्या ४ जानेवारीला स्पष्ट होईल. तालुक्यात सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या डोणगाव ग्रामपंचायतीत सहा वॉर्डमध्ये १७ सदस्य आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनाप्रणीत पॅनल, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत पॅनल, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टी प्रणीत पॅनल व अपक्ष असे १७ सदस्यांसाठी ९६ अर्ज आहेत. मात्र येथील वॉर्ड क्रमांक एकमधील महिलांचा मागास प्रवर्गासाठी फक्त एकच अर्ज अतार सलमा बी सय्यद नूर सध्या फक्त हाच अर्ज आहे. तेव्हा येथे दोन सदस्यांसाठीच लढत होईल, असे संकेत मिळत आहेत. वॉर्ड क्रमांक एकमध्ये काय होणार तेथील एक उमेदवार हे अर्ज नसल्याने अविरोध निवडून येणार की त्यांचे प्रतिस्पर्धी पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली जयगुडे यांच्याकडून माहिती घेतली असता, त्यांनी वॉर्ड क्रमांक एकमध्ये महिलांचा मागासप्रवर्गासाठी फक्त एकच अर्ज आलेला आहे, अशी महिती दिली.
आठवडी बाजारात फटाक्यांची आतषबाजी
डोणगाव येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये एकच अर्ज असल्याने आता लढत होणार नाही, या आशेवर येथील आठवडी बाजारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.