५२८ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:38 AM2020-07-11T11:38:00+5:302020-07-11T11:38:11+5:30
या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जून ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या ५२८ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ५२८ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत जून ते डिसेंबरदरम्यान संपत आहे. या ग्रामपंचायतींची निवडणुक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. प्रशासनाने या ग्रामपंचायतींची माहिती गोळा केली आहे. राज्यपालांनी अध्यादेश जारी करून मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येईल. देउळगाव राजा २६ , मलकापूर ३३, खामगाव ७१, बुलडाणा ५१, जळगाव जामोद २४, संग्रामपूर २७, लोणार १८, चिखली ६०, शेगाव ३४, सिंदखेड राजा ४३, नांदुरा ४८, मोताळा ५२, आणि मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचातींवर प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती मात्र कोरोनाचा संसर्गामुळे या निवडणुका रद्द करण्यात आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.
२२३ ग्रामपंचायतींची मुदत आॅगस्टमध्ये संपणार
जिल्ह्यातील २२३ ग्रामपंचायतींची मुतद ३० आॅगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे, येत्या दोन महिन्यात या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती प्रशासनाला करावी लागणार आहे. प्रशासन काय निर्णय घेते याकडे २२३ गावातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील २२८ ग्रामपंचायतींची मुदत येत्या जुलै ते डिसेंबर २०२० मध्ये संपणा आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रद्द झाल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. -राजेश लोखंडे,
उपमुख्य कार्यकारी, पंचायत जि.प.बुलडाणा