प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:27 AM2020-09-26T11:27:54+5:302020-09-26T11:29:52+5:30

प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतच्या विकासाला खीळ बसत आहे.

Appointment of Administrators hampers Gram Panchayat development | प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

प्रशासकांच्या नियुक्तीने ग्रामपंचायत विकासाला खीळ

googlenewsNext

- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पदभार घेतल्यानंतर प्रशासकांनी ग्रामपंचायतकडे पाठ फिरविली आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतच्या विकासाला खीळ बसत आहे.
जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामपंचायतींवर शासकीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषि अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली.
यापैकी काही अधिकाऱ्यांकडे एक तर काहींचीे तीन ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाºयांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी माजी सरपंच तसेच गावकºयांनी केल्या आहेत.
प्रशासकपदी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाºयांकडे आधीच अनेक कामे आहेत. त्यातच ते व्यस्त असतात. सोबतच त्यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण अधिकच वाढला आहे. सध्या कोरोनामुळेही अनेक कामे वाढली आहे. त्यामुळे अधिकारी ग्रामपंचायतकडे जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नाल्या तुंबल्या आहेत. मात्र नाले सफाई किंवा रस्त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. त्यामुळे गावगाड्याचा कारभार सध्या प्रभावीत झाला आहे.


प्रशासक गावात येतच नाहीत. त्यामुळे गावातील विकासकामे ठप्प आहेत. गावकºयांचीही अनेक कामे रखडली आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसला आहे. निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी आमची मागणी आहे.
- रवी महाले
जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच संघटना बुलडाणा


अधिकारी कमी व गावे जास्त आहेत. त्यामुळे काही अधिकाºयांकडे तीन गावांचे प्रशासकपद देण्यात आले आहे. अधिकारी कामाच्या प्राधान्यानुसार काम करीत आहेत. गावात महत्वाचे काम असले तर प्रथम गावात जातात.
- चंदनसिंग राजपूत
गटविकास अधिकारी, पंचायत समिती खामगाव

Web Title: Appointment of Administrators hampers Gram Panchayat development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.