राज्यातील १९ रिक्त जागांवर मुख्याधिका-यांची नियुक्ती
By admin | Published: December 13, 2014 12:17 AM2014-12-13T00:17:55+5:302014-12-13T00:17:55+5:30
नियमित मुख्याधिकारी म्हणून परिविक्षाधीन मुख्याधिकारी यांची नियुक्ती.
खामगाव (बुलडाणा) : राज्यातील नगर पालिकेच्या रिक्त असलेल्या पदांपैकी १९ पालिकांमध्ये नियमित मुख्याधिकारी म्हणून परिविक्षाधीन मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनेक वर्षांं पासून मुख्याधिकारी पद रिक्त असलेल्या पालिकांमधील मुख्याधिकारी पद भरले जाणार असल्याने विकासातील अडथळा दूर होणार आहे. राज्यातील अनेक पालिकांमध्ये मुख्याधिकारी पद रिक्त आहे. यामुळे अशा रिक्त जागांचा प्रभार नजीकच्या पालिकांमधील मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे प्रभार पाहताना मुख्याधिकारी यांना कसरत करावी लागत होती. तर दोन्ही पालिकांमधील विकासात यामुळे अडसर निर्माण होत होता. त्यामुळे शासनाच्या नगर विकास विभागाने ४ मार्च रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस प्राप्त मुख्याधिकारी गट -ब संवर्गातील मु ख्याधिकार्यांना नियमित पदस्थापना देण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र शासकीय कर्मचार्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणार्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २00५ मधील कलम ४(४) व ४(५) मधील तरतुदीनुसार काही कार्यरत गट-ब संवर्गा तील मुख्याधिकार्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या असून त्यांची पदस्थापना त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या पदावर करण्यात येत आहे.