गणेशोत्सवात विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:51 PM2019-09-04T14:51:46+5:302019-09-04T14:51:59+5:30
पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांची मदत घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गणेशोत्सव काळात पोलिसांची कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यावर भर असला तरी यंदा पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांची मदत घेण्यात येणार आहे. गणेश मंडळामधीलच सकारात्मक युवा नेतृत्त्व पुढे आणण्यासोबतच मंडळस्तरावर होणाºया मनोरंजनात्मक कार्यक्रमादरम्यान प्रसंगी महिलांची होणारी छेडछाड टाळण्याच्या दृष्टीकोणातून मंडळातीलच सदस्यांनी सक्रीय व्हावे, हा दृष्टीकोण यामागे ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अशा विशेष पोलिस अधिकाºयांना नियुक्तीपत्र ही देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
सण उत्सवाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्याशी अनुषंगीक विषयान्वये थेट संवाद साधला असता त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून करण्यात येणाºया उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. संवेदनशील भागामध्ये पोलीसांची नजर असून, त्यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. मलकापूर, खामगाव हे संवेदशील शहर पोलिसांच्या रडारवर आहेत. आगामी काळात असलेल्या विधानसभा निवडणुकामुळे गणेशोत्सवाचा काही असामाजिक तत्त्व गैरफायदा घेऊ शकतात.
उत्सव काळातील हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभागाने गणेश मंडळामधीलच व्यक्तीला विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. गणेश मंडळातील हे विशेष पोलीस अधिकारी केवळ गणेश उत्सव काळापुरतेच राहणार असले तरी, त्यांची मोठी मदत पोलीस विभागाला होणार आहे.
त्याचबरोबर यातून पोलीसांशी असणारा समन्वय वृद्धींगत होणार आहे. हा अभिनव प्रयोग बुलडाणा पोलिसांच्या ईतिहासात प्रथमच राबविण्यात येत आहे. मेळाव्यादरम्यान मेळावा अगर मिरवणुक रस्त्याने जात असतांना त्यातील कोणत्याही व्यक्तीने विशेष परवान्याशिवाय कोणतेही अग्नीशस्त्र, मशाल टेंभे, तलवार, खंजीर, कट्यार, चाकु, काठ्या, बांबु, छोटे दगड, गोफन, अगर कोणतेही शस्त्र अगर ज्यायोगे दुखापत करता येईल असे कोणतेही शस्त्र किंवा पदार्थ घेवुन जावु नये अथवा जवळ बाळगु नये, अशा सुचना पोलिस विभागाने दिलेल्या आहेत.
याची योग्य अंमलबाजवणी होते की, नाही किंवा ज्यांच्या जवळ असे शस्त्र किंवा वस्तु सापडतील त्यांच्या जवळुन ते घेवुन पोलीसांच्या ताब्यात देण्यास नियुक्त विशेष पोलीस अधिकाºयांची महत्त्वपूर्ण मदत जिल्हाभरात पोलीस विभागाला होणार आहे.
संवेदनशील शहरामध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्याच्या दृष्टीकोनातून गणेश मंडळातील व्यक्तींमधून विशेष पोलीस अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मंडळाचा पोलीसांशी असणारा समन्वय वृद्धींगत होईल व गैरप्रकार टाळण्यास मदत होणार आहे.
-डॉ. दिलीप पाटील भुजबळ,
जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा.