गहू व मका खरेदी करण्यासाठी १४ खरेदी केंद्रांना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:21+5:302021-04-09T04:36:21+5:30

या खरेदी केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम २०२०-२१ ...

Approval of 14 procurement centers for procurement of wheat and maize | गहू व मका खरेदी करण्यासाठी १४ खरेदी केंद्रांना मान्यता

गहू व मका खरेदी करण्यासाठी १४ खरेदी केंद्रांना मान्यता

Next

या खरेदी केंद्रांवर कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभूत किंमत योजनेतंर्गत केंद्र शासनाचे वतीने मका प्रति क्विंटल १८५० रूपये, ज्वारी प्रति क्विंटल २६२० रूपये, गहू १९७५ प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, ७/१२ ऑनलाईन पीकपेरासह, बँक पासबुकची आधार लिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आदींसह संबंधित खरेदी केंद्रांवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. कोविड रूग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळी केंद्रावर गर्दी करणे टाळावे, सॅनिटायजरचा उपयोग करावा, तोंडावर मास्क वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबींचे पालन करावे. शेतकरी केंद्रावर नोंदणीसाठी अर्ज घेऊन आल्यास सब एजंट संस्थांनी त्यांच्याकडून तत्काळ अर्ज घेऊन शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हा पणन अधिकारी यांनी दिल्या आहते.

ही आहेत खरेदी केंद्र

तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती, बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, शेगांव, खामगांव, जळगाव जामोद व संग्रामपूर, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर, केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी दे. राजा केंद्र सिंदखेड राजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी याठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Approval of 14 procurement centers for procurement of wheat and maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.