पाच कोटी रुपयांची विकासकामांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:52+5:302021-04-30T04:43:52+5:30
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ. संजय रायमुलकर यांनी ही कामे शासनाकडे सुचविली होती. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ज्या ग्रामपंचायत अविरोध ...
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ. संजय रायमुलकर यांनी ही कामे शासनाकडे सुचविली होती. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान ज्या ग्रामपंचायत अविरोध येतील त्यांना जादा निधी व इतर ग्रामपंचायतीला सुद्धा निधी मंजूर झाला आहे. सिमेंट रस्त्याची कामे मंजूर गावामध्ये लोणार तालुक्यातील हिवरखेड, धायफळ, पारडा दराडे, हिरडव, सोनुना, शिवणी जाट, गोत्रा, कुंडलस, येसापूर, पांग्राडोळे, येवती, बागूलखेड, पिंपळनेर, पळसखेड, अंजनी खुर्द या गावांचा समावेश आहे. तर मेहकर तालुक्यातील मिस्कीनवाडी, दादुलगव्हाण, फैजलापूर, गोमेधर, गजरखेड, गणपूर, कासारखेड, कणका, लावणा, मादणी, मोहना, ना.दत्तापूर, नागापूर, शहापूर, सावत्रा, सारशिव, शिवाजीनगर, शेंदला, उमरा, विवेकानंद नगर, मोहदरी, बाभूळखेड गावांचा समावेश आहे. सभामंडप मंजूर गावात लोणारमधील कोयाळी दहातोंडे, सावरगाव मुंडे, गंधारी, मातमळ, धानोरा तर मेहकरमधील राजणी, बाऱ्हई, आरेगाव, घाटनांद्रा, जवळा, मोळा, पांगरखेड, सावंगीवीर, शेलगाव काकडे, लव्हाळा, हिवरा साबळे, नांद्रा, चायगाव, राजगड गावांचा समावेश आहे. बोरी, ब्रह्मपुरी, मोहना खुर्द, जयताळा येथे स्मशानभूमी बांधकाम, शेलगाव देशमुख येथे सामाजिक सभागृह, मांडवा येथे संरक्षण भिंत व मादणी येथे मल्टि पर्पज हाॅल बांधण्यात येणार आहे.