खुल्या आरक्षित जमिनीवर घरकुलासाठी मान्यता द्या - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:51+5:302020-12-27T04:25:51+5:30

चिखली : शहरातील खुल्या आरक्षित जमिनीवर घरकुलासाठी मान्यता देण्याची मागणी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे. चिखलीतील शेत ...

Approve for Gharkula on open reserved land - Rahul Bondre | खुल्या आरक्षित जमिनीवर घरकुलासाठी मान्यता द्या - राहुल बोंद्रे

खुल्या आरक्षित जमिनीवर घरकुलासाठी मान्यता द्या - राहुल बोंद्रे

googlenewsNext

चिखली : शहरातील खुल्या आरक्षित जमिनीवर घरकुलासाठी मान्यता देण्याची मागणी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.

चिखलीतील शेत सर्व्हे नंबर ९८ मधील आरक्षण क्रमांक ७२ शासकीय मुलींचे वसतिगृह व शासकीय निवासस्थानांसाठी आरक्षित होते; परंतु सदर आरक्षण भाग सहा वगळून रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व शासनाकडे नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलासाठी शासनाकडे पाठविण्यात आलेला होता. शासनाने आयएचएसडीपी योजनेंतर्गत सदर ठिकाणी घरकुलाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. शासनाच्या सध्याच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदर ठिकाणी घरकुलाचा प्रस्तावही सादर आहे. तरी या आरक्षण असलेल्या जागेवर राहत असलेल्या लाभार्थींना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने शासनाकडे शिफारस करावी, अशी विनंती माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. शेत सर्व्हे क्रमांक ९८ मधील आरक्षण क्रमांक ७२ व १७ शासकीय निवासस्थांसाठी प्रस्तावित होते. शासनाने आयएचएसडी योजनेंतर्गत सदर ठिकाणी घरकुलाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे.

Web Title: Approve for Gharkula on open reserved land - Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.