सोमठाणा पुलाच्या प्रस्तावास मंजुरात द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:54+5:302021-09-16T04:42:54+5:30
चिखली : तालुक्यातील सोमठाणा येथील वाढील पुलाचा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असल्याने त्या पुलाच्या प्रस्तावास मंजुरात देण्यात यावी, तसेच रस्ता ...
चिखली : तालुक्यातील सोमठाणा येथील वाढील पुलाचा प्रश्न शासनदरबारी प्रलंबित असल्याने त्या पुलाच्या प्रस्तावास मंजुरात देण्यात यावी, तसेच रस्ता डांबरीकरणाचे काम तातडीने करण्यात यावे, यांसह तालुक्यातील रस्ते व शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचा निपटारा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विनायक सरनाईक यांनी ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे १३ सप्टेंबर रोजी अब्दुल सत्तार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक सरनाईक यांनी ना. सत्तार यांची भेट देऊन उपरोक्त मागण्यांसदर्भाने निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने सोमठाणा येथील रस्त्याचे व पुलाच्या प्रस्तावाकडे त्यांनी लक्ष वेधले. या ठिकाणच्या पुलाची उंची वाढविणे गरजेचे असल्याने संबंधित विभागास आदेशित करण्यात यावे व वाढीव प्रस्तावास मंजुरात देण्यात यावी. तसेच पळसखेड जयंती रस्त्याची खस्ता हालत पाहता उर्वरित रस्ता डांबरीकरण काम करण्यात यावे, तसेच ई-पीक पेरासंदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यात याव्यात, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी ना. अब्दुल सत्तार यांच्या केली आहे. या मागणीची दखल घेत ना. सत्तार यांनी याबाबत उचित कारवाईचे अश्वासन दिले आहे. यावेळी स्वाभिमानीचे रविराज टाले, अमोल पवार, जगाराव ठेंग, प्रकाश ठेंग, पुरुषोत्तम जाधव, रमेश ठेंग, रामेश्वर पवार, ज्ञानेश्वर ठेंग, रामेश्वर चेके, गोपाल मोरे, सचिन खरात यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.