जलवाहिनी लिकेज, पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:34 AM2021-02-16T04:34:52+5:302021-02-16T04:34:52+5:30
बुलडाणा : शहरातील चिखली रस्त्यावर पाइपलाइन लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे. गत चार महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय हाेत असताना ...
बुलडाणा : शहरातील चिखली रस्त्यावर पाइपलाइन लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे. गत चार महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय हाेत असताना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे.
बुलडाणा शहराला नगर पालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून येळगाव धरणातून पाणीपुरवठा करण्यात येताे. उन्हाळ्यात दरवर्षी शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागताे. यावर्षी येळगाव धरणात मुबलक पाणी असूनही सातव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येताे. येळगाव धरणातून टाकलेली पाइपलाइन चिखली रस्त्याने टाकण्यात आली आहे. याच मार्गाने सुंदरखेड ग्रामपंचायतची पाइपलाइन टाकलेली आहे. गत तीन ते चार महिन्यापासून चिखली राेडवर पाइपलाइन लिकेज झाली आहे. पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर या लिकेजमधून हजाराे गॅलन पाण्याचा अपव्यय हाेताे. लिकेज झालेली पाइपलाइन बुलडाणा नगर पालिकेची की सुंदरखेड ग्रामपंचायतीची यावरुन संभ्रम असल्याने तीन ते चार महिन्यांपासून त्याची दुरुस्तीची तसदी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शेकडाे लिटर पाण्याचा अपव्यय हाेत आहे. नागरिकांना लिकेज झालेल्या पाइपलाइनमधून दूषित पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. लिकेज पाइपलाइनमधून हजाराे लिटर पाण्याचा अपव्यय हाेत आहे. याकडे नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
रस्त्यावर वाहते पाणी
पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर लिकेजमधून माेठ्या प्रमाणात पाणी वाहते. हे पाणी रस्त्याने वाहत असल्याचे चित्र आहे. लिकेज काढून पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. याच रस्त्यावर आणखी तीन ते चार ठिकाणी लिकेज असल्याचे चित्र आहे.