नक्षली भागात 'एरिया डॉमिनेशन'ला दिले होते प्राधान्य- रमेश बरकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 05:56 PM2020-06-13T17:56:58+5:302020-06-13T17:57:22+5:30

रमेश बरकते यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कामाच्या संदर्भाने संवाद साधला.

Area domination was given priority in Naxal areas - Ramesh Barkate | नक्षली भागात 'एरिया डॉमिनेशन'ला दिले होते प्राधान्य- रमेश बरकते

नक्षली भागात 'एरिया डॉमिनेशन'ला दिले होते प्राधान्य- रमेश बरकते

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नक्षली भागात सेवा दिल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत आणि बुलडाणा एसडीपीओ रमेश बरकते यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक जाहीर झाले आहे. त्यानुषंगाने रमेश बरकते यांनी त्यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कामाच्या संदर्भाने संवाद साधला. गोंदियामध्ये पोलिस अधीक्षकांसोबतच ते कर्तव्यावर होते.


गोंदिया सारख्या नक्षली भागात काम करताना आपण कोणती काळजी घेतली? 
नक्षली भाग म्हणून हा परिसर ओळखला जातो. येथे आपली पहिलीच पोस्टींग होती. या भागात जवळपास तीन वर्षे आपण सेवा दिली. येथे कायम सतर्क रहावे लागते. प्रामुख्याने नक्षली गनिमी काव्याने हल्ला करतात. त्यामुळे या भागात पोलिसांना सतत सतर्क रहावे लागते. 


आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय?  
हे पदक जाहीर झाल्याबद्दल मनस्वी आनंद झाला आहे. केंद्र सरकारकडून हे पदक दिल्या जाते. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या समवेत बुलडाणा जिल्ह्यात आपल्यालाही हे पदक जाहीर झाले. गोंदियामध्ये पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासोबत काम करण्याची आपल्याला संधी मिळाली होती.


तेथील कामाची पद्धत नेमकी कशी होती? 
गोंदियामध्ये २० आॅगस्ट २०१६ ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत आपण एसडीपीओ म्हणून काम केले. प्रामुख्याने पेट्रोलिंग, नक्षल सप्ताहादरम्यान सर्चिंग करण्यात येत होते. सोबतच पोलिस विरुद्ध नक्षल असा येथे सामना आहे. त्यामुळे प्रामुख्याने ऐरिया डॉमिनेशनला अधिक प्राधान्य आम्ही दिले होते. सतर्कतेसेबतच शांत डोक्याने येथे काम करण्यास प्राधान्य दिले होते.


नक्षली भाग वगळता राज्यात अन्यत्र सेवा देताना नेमका फरक काय ?. 
नक्षली भागात तुलनेने गुन्हेगारी कमी आहे. पोलिस विरुद्ध नक्षली असे दंद्व या भागात आहे.सोबतच हा संपूर्ण भाग जंगालने व्यापलेला आहे. पहाडी भाग आहे. नक्षली गणीमी पद्धतीने हल्ला करतात. त्यामुळे पोलिस प्रशासनाला येथे कायम सतर्क रहावे लागते. गोपनीय माहितीही खात्रीशीरपणे जमा करावी लागते. थोडक्यात जोखीम क्षेत्रामध्ये प्रामुख्याने हा नक्षली भाग येतो. आपली मानसिकताही या भागात अधिक कणखर बनते.

राज्य शासनातर्फे दिला जाणारे विशेष सेवा पदकही आपल्याला मिळाले आहे. खडतर सेवा पदक म्हणूनही त्याची ओळख आहे. गुणात्मक व कार्यक्षमपणे काम करण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. पुढील वाटचालही त्यानुषंगानेच राहील.
नक्षली भागात नेहमी सतर्क राहावे लागते. जोखीम क्षेत्र म्हणून प्रामुख्याने हा भाग ओळखल्या जातो. येथे तीन वर्षे सेवा दिली. - रमेश बरकते

Web Title: Area domination was given priority in Naxal areas - Ramesh Barkate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.