खामगावात मेंढपाळांचा आरोळी मोर्चा, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

By अनिल गवई | Published: September 26, 2022 02:14 PM2022-09-26T14:14:56+5:302022-09-26T14:15:33+5:30

मेंढपाळ आणि पशुपालक यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आयोजित या मोर्चात मेंढपाळ आणि पशुपालक मोठ्यासंख्येने सहभागी झाले

Aroli march of shepherds in Khamgaon, statement to sub-divisional officers | खामगावात मेंढपाळांचा आरोळी मोर्चा, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

खामगावात मेंढपाळांचा आरोळी मोर्चा, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Next

खामगाव : मेंढपाळांच्या न्याय -हक्क-वन अधिकार यासाठी  मेंढपाळ पुत्र आर्मीच्यावतीने सोमवारी खामगाव येथे आरोळी मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सुरूवात झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे निदर्शने करण्यात आली.

मेंढपाळ आणि पशुपालक यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आयोजित या मोर्चात मेंढपाळ आणि पशुपालक मोठ्यासंख्येने सहभागी झाले. यावेळी देशाच्या अमृत महोत्सवात आमच्या पशुपालक - मेंढपाळ यांचा सुद्धा हक्क असून , इंग्रज कालीन जुलमी वन कायद्या पासून मेंढपाळ, पशुपालक यांना स्वातंत्र्य देण्यात यावे. राज्यात १. ५ करोड शेळ्या मेंढ्या यांची संख्या असतांना , त्यांना  संरक्षण देणारी विमा योजना सुरू करण्यात यावी, पशुपालक समाजाच्या उदरनिवार्हासाठी  चराऊ कुरणे संरक्षीत करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आले.   या मोर्चाचे मेंढपाळ पुत्र आर्मीचे सौरभ हटकर यांनी केले. यावेळी माजी आमदार  नानाभाऊ कोकरे, अशोक हटकर , शांताराम भाऊ बोधे , दादाराव हटकर , प्रभाकर वरखेडे ,  रामा शिंगाडे , डॉ . संतोष हटकर , डॉ. पांडुरंग हटकर प्रमुख उपस्थिती होती. या मोर्चात मेंढपाळ पुत्र आर्मीचे पदाधिकारी कार्यकर्ते , सकल धनगर मेंढपाळ समाज बांधव उपस्थित होते.
 

Web Title: Aroli march of shepherds in Khamgaon, statement to sub-divisional officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.