महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:28+5:302021-03-08T04:32:28+5:30
या १३ ही केंद्रांवर सरकारच्या निकषांनुसार ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना ...
या १३ ही केंद्रांवर सरकारच्या निकषांनुसार ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटांतील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी केेले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष लसीकरण सत्र राहील. चिखली ग्रामीण रुग्णालय, देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड प्राथमिक आरोग्य केंद्र, खामगावातील सामान्य रुग्णालय, लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही विशेष लसीकरण सुविधा राहील.
याव्यतिरिक्त मलकापूर तालुक्यासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात, मेहकरसाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात, मोताळ्यासाठी बोराखेडी आरोग्य केंद्रात नांदुरा तालुक्यासाठी नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, शेगाव तालुक्यासाठी आडसूळ, संग्रामपूर तालुक्यासाठी सोनाळा आणि सिंदखेड राजा तालुक्यासाठी सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे.
--या महिला घेऊ शकतील लस--
शासन निकषांनुसार ६० वर्षांवरील महिला तसेच दुर्धर आजार असणाऱ्या ४५ ते ५९ वयोगटांतील सहविकार असलेल्या महिलांना ही लस दिली जाईल. शासनाने ठरवून दिलेल्या मधुमेह, उच्च रक्तदाव व अन्य असे २० आजार असणाऱ्या महिलांना ही लस दिली जाईल. याव्यतिरिक्त आरोग्य विभागातील तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या महिलांनाही या विशेष लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.