त्या मजुरांची थकीत रक्कम वनविभागाकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:40 AM2021-09-08T04:40:56+5:302021-09-08T04:40:56+5:30

साखरखेर्डा : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनमजुरांची नेमणूक करून सतत तीन वर्षे वृक्षलागवड, खड्डे खोदणे, मरगळ काढणे, उन्हाळ्यात पाणी देणे, ...

The arrears of those laborers go to the forest department | त्या मजुरांची थकीत रक्कम वनविभागाकडेच

त्या मजुरांची थकीत रक्कम वनविभागाकडेच

Next

साखरखेर्डा : वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनमजुरांची नेमणूक करून सतत तीन वर्षे वृक्षलागवड, खड्डे खोदणे, मरगळ काढणे, उन्हाळ्यात पाणी देणे, निंदन करणे ही कामे केली. ही कामे संस्थेच्या माध्यमातून झाली नसून, वनाधिकारी मजुरांची दिशाभूल करीत आहेत. मजुरांचे पैसे हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यशोदीप मजूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे.

दरेगाव येथील २० हेक्टर, नागझरी येथील ३८ हेक्टर, काटेपांग्री येथील २० हेक्टर, तढेगाव येथील १० हेक्टर ई-क्लास जमिनीवर आणि हनवतखेड ते शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा ते आंबेवाडी, शेंदुर्जन ते नागझरी या रस्त्यालगत कामे केली आहेत. सिंदखेडराजा वनाधिकारी यांच्या आदेशाने वनमजुरांची खड्डे खोदणे, झाडे लावणे, एक महिन्यानंतर मरगळ आलेली झाडे शोधून त्या ठिकाणी पुन्हा झाडे लावणे, निंदन करणे, पाणी देणे ही कामे हनवतखेड, आंबेवाडी, शेंदुर्जन येथील मजुरांनी केली. या कामाची पाहणी वनपाल चेतन लद्धड यांनी केली. सुरुवातीला लागवड केलेल्या झाडांचे (वृक्षांचे) दोन महिन्यांचे पैसे वनाधिकारी खलसे यांनी दिले. त्यानंतर, निंदन, पाणी देणे इत्यादी कामाचे पैसे बाकी आहेत. त्या मजुरीचे पैसे मिळावे, यासाठी भगवान भाऊराव महाजन, राजू नितनवरे, राजू सावरकर या वनमजुरांनी मार्च महिन्यात मागणी केली हाेती़. या कामाची पाहणी अहवाल पाच सदस्यीय समितीने तयार केला असता, एप्रिल महिन्यात पैसे देतो, म्हणून डीएफओ पार्डीकर, एस.एफ. भगवान पायघण यांच्या समक्ष वनाधिकारी खलसे यांनी सांगितले. आज सहा महिने झाले. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे यांच्या बदलीचे आदेश आले, तरीही खलसे यांनी वनमजुरांना कामाचे पैसे दिले नाहीत. पैसे मागितले असता, खलसेंनी उडवाउडवीची उत्तरे देऊन, ती कामे यशोदीप मजूर कामावर सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचा बनवाबनवीचा प्रकार करून लाखो रुपये हडप करण्याचा उद्देश आहे, असा आरोप मजुरांनी केला आहे.

या कामाची चौकशी करण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केला आहे. मजुरांची मागणी योग्य आहे.

बी.सी. चव्हाण.

चौकशी समिती सदस्य

संबंधित कामे ही संस्थेच्या माध्यमातून झाली नाही. ती कामे वनाधिकारी यांनी मजूर लावून केली आहेत.

सुरेश जाधव, अध्यक्ष, यशोदीप मजूर कामगार सहकारी संस्था.

Web Title: The arrears of those laborers go to the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.