मेहकर सिंचन विभागातील वरीष्ठ सहाय्यकास तीन हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:38 PM2018-03-05T18:38:58+5:302018-03-05T18:38:58+5:30
मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले.
मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. मयत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीकडून गटविम्याचे बिल काढून देण्यासाठी आरोपीने ३ हजार रूपये लाचेपोटी मागीतले होते. याबाबत तक्रारकर्त्या महिलेचे पती जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाहक म्हणून कार्यरत होते. ते सन २०१४ मध्ये मयत झाले आहेत. मयत पतीचे गटविम्याचे बिल काढून देण्यासाठी दिनेश कोंडेकर यांनी तक्रारकर्त्या महिलेकडे ३ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात लाचलुचपत विभाग बुलडाणा यांनी ५ मार्च रोजी सापळा रचून तक्रारकर्त्या महिलेकडून दिनेश कोंडेकर यांनी पोलीस स्टेशन मेहकरचे बाजुला फळ विक्रेत्याचे दुकानासमोर ३ हजार रूपये स्विकारले. या बाबत लाचलुचपत विभागाच्या कर्मचाºयांनी दिनेश शंकर कोंडेकर यांना रंगेहात पकडून त्यांचे विरूध्द कलम ७,१३ (१)(ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ नुसार कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, बुलडाणाचे पोलीस उपअधिक्षक शैलेष जाधव यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्र.बा. खंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजु जंौजाळ, पोलिस नाईक दिपक लेकुरवाळे पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, चालक पोलिस नाईक समिर शेख यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)