छत्तीसगडमधील खून प्रकरणातील आराेपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:37 AM2021-03-09T04:37:28+5:302021-03-09T04:37:28+5:30
छत्तीसगड राज्यातील जसपूर जिल्ह्यातील पधलगांव येथे मनिषा नावाच्या महिलेची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाला हाेता. या प्रकरणी झारखंड ...
छत्तीसगड राज्यातील जसपूर जिल्ह्यातील पधलगांव येथे मनिषा नावाच्या महिलेची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाला हाेता. या प्रकरणी झारखंड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला हाेता. तपासात सदर महिलेचा खून आरोपी अभिषेक कुमार रमेश सिंग, रा. डाल्टेन गंज, जि. पलामू, राज्य झारखंड याने केल्याचे निष्पन्न झाले हाेते. परंतु आरोपी हा घटना केल्याच्या तारखेपासुन फरार असल्याने छत्तीसगड येथील तपास पथक त्याच्या मागावर होते. ०७ मार्च राेजी रोजी पोलीस अधीक्षकांना छत्तीसगड राज्यातील वरिष्ठ कार्यालयातून आरोपी हा बुलडाणा परिसरात असल्याची माहिती मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून आराेपीचा शाेध सुरू केला हाेता. हा आराेपी धोत्रा फाटा, देऊळगाव मही परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफीने आरोपी अभिषेक कुमार रमेश सिंग यास ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाहीसाठी सदरील आरोपीस छत्तीसगड राज्यातील जसपूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे पथलगांब यांचे प्रभारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात पाेलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत जिंदमवार, पोउपनि पोलीस अंमलदार, विजय सोनोने, गजानन गोरले व वैभव मगर यांनी पार पाडली आहे.