वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 02:01 PM2019-10-29T14:01:30+5:302019-10-29T14:01:36+5:30

ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली

Arrested for selling train tickets by 'hacked' website | वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

वेबसाईट 'हॅक' करुन रेल्वेचे तिकीट विक्री करणाऱ्यास अटक

googlenewsNext


बुलडाणा: रेल्वची वेबसाईट हॅक करुन रेल्वे तिकिटांची अवैध विक्री सुरु असल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी बुलडाण्यात उघडकीस आला. याप्रकरणी शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील ड्रीम व्हॅली मल्टीसर्विसेसवर छापा मारुन रेल्वे पोलिसांनी दुकानाच्या संचालकास अटक केली. या कारवाईत संगणक, प्रिंटर, मोबाईल, नेटसेटर जप्त करण्यात आले.
दिवाळीच्या दिवसात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यातच तिकिटांचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशावेळी नागरिकांना तत्काळचे तिकीट देण्यासाठी एजंटचे प्रयत्न सुरु असतात. शहरातील स्टेट बँक चौक परिसरातील ड्रीम व्हॅली मल्टी सर्विसेसचा संचालक सुनील वाघ गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेच्या आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक करीत होता. वेबसाईट हॅक करुन तो तिकीट काढायचा. या वेबसाईटवर एजंटला चार ते पाच तिकीट बुक करण्याची सोय असते. मात्र सुनील वाघ ही साईट हॅक करुन कित्येक कन्फर्म तिकीट काढायचा. रेल्वेच्या सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. आरपीएफच्या पथकाने सुनील वाघ यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे पुढील दिवसांचे अनेक कन्फर्म तिकीट आढळून आले.
याप्रकरणी आरोपीविरुध्द रेल्वे अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी, अधिकाºयांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का याबाबत चौकशी सुरु आहे. या कारवाईत रेल्वे सुरक्षा बलचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दिक्षीत यांच्या पथकातील निरीक्षक राजेश बनकर, उपनिरीक्षक आर. के. सिंग, सी. एस. सातपुते, प्रधान आरक्षक नितीन लोखंडे, आरक्षक शेख नावेद, प्रमोद ढोले, सुजित यादव, संतोष यादव यांनी सहभाग घेतला.
(प्रतिनिधी)

Web Title: Arrested for selling train tickets by 'hacked' website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.