बाप्पांचे आगमन, विसर्जन कोरोना नियम पाळूनच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:38 AM2021-09-05T04:38:41+5:302021-09-05T04:38:41+5:30

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे अध्यक्षस्थानी हाेते़ पोलीस निरीक्षक सातव यावेळी म्हणाले की, यावर्षी पोळा सण, गणपती आगमन ...

Arrive Bappa, follow the immersion corona rules | बाप्पांचे आगमन, विसर्जन कोरोना नियम पाळूनच करा

बाप्पांचे आगमन, विसर्जन कोरोना नियम पाळूनच करा

Next

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया हे अध्यक्षस्थानी हाेते़ पोलीस निरीक्षक सातव यावेळी म्हणाले की, यावर्षी पोळा सण, गणपती आगमन व विसर्जन मिरवणुकीला शासनाच्या आदेशानुसार परवानगी नाही. परंतु गणेश उत्सवादरम्यान दैनंदिन पूजा-अर्चा आरती हे अतिशय साधेपणाने कोणताही सोहळा न करता करावी. तसेच आकर्षक डेकोरेशन न लावता कोरोनाबाबत जनजागृती करा. पर्यावरणपूर्वक गणेश उत्सव साजरा करा, असे आवाहन केले. पोलीस अधीक्षक चावरिया यांनी कोरोनाबाबत गाफील न राहता कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक भाविकाने कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन न करता दक्ष राहणे गरजेचे आहे. उत्सवादरम्यान सर्वांनी जातीय सलोखा राखावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीसाठी उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सारिका भगत, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे, पोलीस समाधान बंगाळे, सचिन मुदेमाळी आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह समितीचे पदाधिकारी संतोष खांडेभराड, माजी नगराध्यक्ष विजय देव, उपाध्यक्ष गणेश सवडे, अर्पित मिनासे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Web Title: Arrive Bappa, follow the immersion corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.