युवा महोत्सवातून कलाविष्काराचा जागर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 02:48 PM2019-12-22T14:48:16+5:302019-12-22T14:48:23+5:30
शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरील युवा महोत्सवातून कलाविष्कारांचा जागर पाहायला मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : युवा महोत्सव म्हणजे युवकांच्या कलागुणांना वाव देणारे हक्काचे व्यासपीठ. जिल्ह्यातील युवकांना हे हक्काचे व्यासपीठ क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल येथे शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हास्तरील युवा महोत्सवातून कलाविष्कारांचा जागर पाहायला मिळाला. यामध्ये जिल्ह्यातील युवक व युतींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात लोकगीत, लोकनृत्य व वक्तृत्व स्पर्धा, एकांकीकाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणून प्रा.डॉ.कामीनी मामर्डे, अंजली परांजपे, रविकिरण टाकळकर, टिळक क्षिरसागर, कैलास कोल्हे, प्रा. सुभाष मोरे यांनी काम पाहिले. या महोत्सवात युवकांच्या कलागुनांना दादा मिळाली. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकुण आठ स्पर्धकांनी भाग घेवुन प्रथम क्रमांक कांचन बुडबुले जनता कला महाविद्यालय, मलकापूर, द्वितीय अक्षय गणेश तायडे जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, तृतीय कल्याण रामेश्वर देशमुख, अंत्री देशमुख, तबला या प्रकारामध्ये प्रथम अंश महेंद्र श्रीवास, द्वितीय भवानी प्रसाद सोळंके अभिजित संगीत विद्यालय, बुलडाणा, तृतीय गौरव येसकर, स्वर साधना संगीत विद्यालय, बुलडाणा तसेच शास्त्रीय नृत्य प्रकारामध्ये प्रथम आर्या राजेश इंगळे (कथ्थक) शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, मृदंग प्रथम अमोल समाधान धनलोभे अभिजित संगीत विद्यालय बुलडाणा, द्वितीय अविनाश गजानन तळेकर श्री व्यंकटेश कला व महाविद्यालय, देऊळगांव राजा तर हार्मोनियम (लाईट) प्रथम वैष्ण्वी विजय रिंढे स्वरतरंग बहु. संस्था सुंदरखेड, प्रभु सखाराम डोके, श्री व्यंकटेश कला व महाविद्यालय, देऊळगांव राजा, तृतीय प्रणव सुरेश दाते शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलडाणा, यांनी पटकाविला. यशस्वी युवकांना महोत्सवाचा बक्षिस वितरण करून गौरविण्यात आले.