जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावणार - अरविंद चावरीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 06:51 PM2020-10-03T18:51:35+5:302020-10-03T18:51:44+5:30

रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली.

Arvind Chawria will sort out the work by fixing the responsibility | जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावणार - अरविंद चावरीया

जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावणार - अरविंद चावरीया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पोलिस दलातील कमी असलेल्या मनुष्यबळाचा समतोल राखून रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगार शोधून त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर बुलडाणा पोलिस दलात नवीन काय करणार याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.


पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणते नवीन उपक्रम राबवणार?
सध्या त्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. मात्र पोलिस कॉन्स्टेबल ते अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी १०० टक्के पुर्ण करून कामे निकाली काढण्यावर आपला भर राहणार आहे. प्रथमत: कर्तव्याला प्राधान्य देवून कायदा व सुव्यस्था आबाधीत राहील यासाठी प्रयत्नरत राहणार.


संवेदनशील भागात पोलिसांची कमतरता आहे?
हो. संवेदनशील म्हणून गणल्या जाणाºया खामगाव, मलकापूर, शेगाव, सह अन्य पट्ट्यात मनुष्यबळ कमी आहे. तेथे ते वाढविण्यास प्राधान्य दिले असून चार पैकी तीन दंगा काबू पथके प्रामुख्याने या भागात ठेवण्यात आले आहेत. संख्याबळ वाढविण्यासही सुरूवात केली.


दंगा काबू पथकाचे पुनर्गठन करण्यामागील उद्देश?
जिल्ह्याची एकंदर स्थिती पाहता नियमानुसार चार दंगा काबू पथके असणे गरजेचे आहे. त्यातच १३२ पेक्षा अधिक पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे पाच ऐवजी चार दंगाकाबू पथके आता राहतील. संवेदनशील असलेल्या मलकापूर, खामगाव शेगाव येथे पैकी तीन तैनात केले आहेत.


पोलिस दलातील कोरोना प्रतिबंधासाठी काय करणार?
पोलिस दलातही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत असून ठाणेदार व एसडीपीओ त्या भागाचे कुटुंब प्रमुख केले आहेत. दैनंदिनस्तरावर त्याचा आढावा घेत असून अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देतात.


नवीन पोलिस उपविभागाबाबत  हालचाली आहेत का?
नवीन पोलिस उपविभागा स्थापन्यासंदर्भात शासनस्तरावर हालाचली आहेत. तसा प्रस्ताव गेला आहे. जळगाव जामोद, चिखली आणि अन्य एका अश्या तीन एसडीपीओ कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणार आहोत. मुळात २७३२ पोलिसांची जिल्ह्यास गरज असताना २६०० पोलिस आज कार्यरत आहेत. ११९  पीएसआयची गरज असताना ३३ कमी आहेत. दोन पीआय आणि दोन एसडीपीओंची पदे रिक्त आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास गुणात्मक प्राधान्य राहील.

सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी या दृष्टीकोणातून नऊ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. कोवीड संसर्गाच्या संदर्भाने गणेशोस्तवाप्रमाणेच दुर्गा उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने शांतता समित्याच्या बैठकाही येत्या आठवड्यात घेणार असून नियमानुसार सर्व होईल. कमी मनुष्यबळ असल्याने दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात आले असून जिल्हा मुख्यालयी ही कर्मचारी वाढवले आहेत- 
अरविंद चावरिय , जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: Arvind Chawria will sort out the work by fixing the responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.