खामगाव कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल १६१ अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 22:37 IST2023-04-03T22:36:59+5:302023-04-03T22:37:14+5:30
Khamgaon :

खामगाव कृषीउत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल १६१ अर्ज दाखल
खामगाव - बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गजांनी परस्पर विरोधी पॅनेल उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे पॅनल कुणाच्या नेतृत्वातील असा संभ्रम निवडणुकीपूर्वीच निर्माण झाला आहे.
खामगाव येथील कृउबास निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर सोमवारी सर्वच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांसह सूचक अनुमोदकांची एकच भाऊगर्दी झाली होती. अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांनी परस्पर विरोधी पॅनेल उभे केले आहे. दरम्यान दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीचे पॅनेल आपल्याच नेतृत्वातील असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली असतानाच. नेत्यांच्या परस्पर विरोधी पॅनलमुळे विरोधकांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी घडलेल्या या घडामोडीमुळे निवडणुकीतील चित्र पूर्णत: बदलल्याचे दिसून येते. त्याचवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीनेही ११ अर्ज दाखल करण्यात आले. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने वेगळी चूल मांडल्याने महाविकास आघाडीत नेमके कोण, असाही प्रश्न उपसि्थत होत आहे.
सेवा सहकारी सोसायटीतील आरक्षण निहाय उमेदवार
सर्वसाधारण ६५
महिला १०
इतर मागास प्रवर्ग ११
भजविजा ०६
एकुण ९२
ग्रामपंचायत मतदार संघ
सर्वसाधारण ३५
अनुजाती जमाती १४
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ०५
एकुण ५४
अडते व्यापारी मतदार संघ १२
हमाल मापारी मतदार संघ ११