गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:22 PM2024-07-22T16:22:21+5:302024-07-22T16:22:53+5:30

या तेजीचे कारण म्हणजे, एक मोठी डील. खरे तर, अनंत राजची मालकी असलेल्या सहायक कंपनीने गूगल एलएलसीसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. 

As soon as the deal with Google was done, investors jumped on 'anant raj' share, the share increased by 13 percent in an instant | गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला!

गुगलसोबत डील होताच 'या' शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, झटक्यात 13 टक्क्यांनी वधारला!

शेअर बाजारातील अनंत राजचा शेअर आज (सोमवार) व्यवहारादरम्यान फोकसमध्ये आहे. हा शेअर 13% ने वधारून 540 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहोचला आहे. या तेजीचे कारण म्हणजे, एक मोठी डील. खरे तर, अनंत राजची मालकी असलेल्या सहायक कंपनीने गूगल एलएलसीसोबत एका करारावर स्वाक्षरी केली आहे. 

या करारांतर्गत, कंपनी विविध प्रकारच्या पब्लिक आणि प्रायव्हेट व्यवसायांसाठी डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर, डीसी व्यवस्थापित सेवा आणि क्लाउड प्लॅटफॉर्म देईल. एवढेच नाही तर, संबंधित कंपनी संभाव्य ग्राहकांसाठी नोव्हल टेक्नॉलॉजी सोल्यूशन देखील प्रोव्हाइड करेल.

कंपनीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की, पार्ट्या ग्राहकांना डेटा इंफ्रास्ट्रक्चर, प्रोडक्टिव्हिटी आणि डिफेन्ससाठी उद्देश्य-निर्मित अल-इन्फ्यूज्ड सॉल्यूशन बनवण्यात मदद करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतील. अनंत राज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड मानेसर, राय आणि पंचकूलामध्ये 300 मेगावॅट आयटी लोडसह डेटा सेंटर तयार करत आहे. मानेसरमध्ये पहिला टप्पाही पूर्ण झाला आहे.

अशी आहे शेअरची स्थिती -
अनंत राजचा शेअर आज बीएसईवर 511.90 रुपयांवर खुला झाला. या शेअरने 540 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकाला आणि 496.30 रुपयांच्या इंट्राडे नीच्चांकालाही स्पर्ष केला. trendlyne.com नुसार, अनंत राजच्या शेअरची किंमत एकाच वर्षात 173.1% ने वधारली आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 551.95 रुपये तर नीचांक 180.85 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 17468.91 कोटी रुपये एवढे आहे.

Web Title: As soon as the deal with Google was done, investors jumped on 'anant raj' share, the share increased by 13 percent in an instant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.