आशा वर्कर्सचा आहार वाटपास नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:24 AM2017-09-28T01:24:19+5:302017-09-28T01:24:27+5:30
डोणगाव : अंगणवाडी सेविका संपावर असल्यामुळे बालकांना पोषण आहार देण्याचे आदेश मेहकर बालविकास अधिकारी यांनी आशा वर्कर यांना दिले होते; परंतु २६ सप्टेंबरला डोणगाव प्रा.आ.केंद्रात येणार्या ५१ आशा वर्कर्सनी पोषण आहार वाट पास नकार देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क

या निवेदनामध्ये नमूद केले आहे की, अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे खंडित होऊ नये म्हणून ही सेवा तात्पुरत्या स्वरुपात विनाखंडित चालू रहावी, म्हणून आशा वर्कर यांना आदेश देण्यात आले होते; परंतु राज्य स्तरावर पोषण आहाराचे काम आशांनी स्वीकारु नये, असे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सर्व आशा वर्कर पोषण आहार देण्यास नकार देत आहे, असे नमूद केले आहे. सदर निवेदनावर सुनीता तुरुकमाने, सुनीता भगत, श्वेता सोमटकर, लता चव्हाण, सारिका खंडारे, रंजना राठोड, नंदा मैदकर, सुनिता कांबळे, साधना राठोड यांच्यासह ४१ आशा वर्करच्या सह्या आहेत.