बुलडाणा येथे आशीर्वाद कोविड केअर सेंटर सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:40 AM2021-03-01T04:40:45+5:302021-03-01T04:40:45+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांच्यावर उपचार करणारी रुग्णालये कमी असल्याने, तसेच कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर अत्याधुनिक उपचार व ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांच्यावर उपचार करणारी रुग्णालये कमी असल्याने, तसेच कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर अत्याधुनिक उपचार व इतर सुविधा माफक दरात मिळावी, रुग्णांची गैरसोय टळावी, सोबतच या आजाराने कोणासही जीव गमवावा लागू नये, या उदात्त हेतूने आशीर्वाद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. नितेश छाजेड (एम.डी. मेडिसिन) व डॉ. दीपक काटकर (एम.बी.बी.एस., एम.डी.चेस्ट मेडिसीन) यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य आशीर्वाद कोविड सेंटर २५ फेब्रुवारीपासून जनसेवेत रुजू झाले आहे. आशीर्वाद हॉस्पिटल कॅम्पस, महाराष्ट्र बँकेसमोर बुलडाणा येथे सुरू करण्यात आलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये कोविड रुग्णांसाठी आयसीयू, व्हेंटिलेटर, एचएफएनओ मशीन, डेफिब्रिलेटर, डायलिसिस, डिजिटल एक्स-रे यासह अॅम्ब्युलन्स व पॅथॉलॉजी लॅबची चोवीस तास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, कोरोनाबाधित रुग्णांना सर्व सुविधा माफक दरात पुरविण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ व अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या उद्देशाने आशीर्वाद कोविड केअर सेंटर सातत्याने कार्यरत असून, कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी सर्वांनी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी व आशीर्वाद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरचा जिल्ह्यातील रुग्णांची लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. दीपक काटकर व डॉ. नितेश छाजेड यांनी केले आहे. (वा.प्र.)