वेतनासाठी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:47 PM2019-05-08T14:47:32+5:302019-05-08T14:47:49+5:30
बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत.
बुलडाणा: जिल्ह्यातील आश्रम शाळेवर कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन वारंवार प्रलंबीत राहत असल्याने कर्मचाºयांच अडचणी वाढल्या आहेत. गत दोन महिन्यापासून या कर्मचाºयांना वेतनाची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे आश्रम शाळेतील कर्मचाºयांची होरपळ होत आहे.
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर मिळून जवळपास ५०० पेक्षा अधिक नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून अनेक प्रयत्न होताना दिसून येतात. जिल्ह्यात विमुक्त जाती भटक्या जमातीच्या २४ शाळा असून त्यामध्ये प्राथमिक शाळा १४, माध्यमिक आठ व उच्च माध्यमिक दोन शाळांचा समावेश आहे. या आश्रमशाळांवर कार्य करणाºया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन हे सामाजिक न्याय विभागांतर्गत होते. वेतनासाठी मुबलक अनुदान नसेल तर वजा रकमेमधून वेतन करावे व १ तारखेलाच वेतन मिळावे, असे आदेश आहेत. मात्र तरीसुद्धा बिल पास न होणे, तांत्रिक अडचणींचा खोडा यासारख्या कारणांमुळे आश्रमशाळेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या वेतनामध्ये अनियमीतता दिसून येते. नियमीत वेतन होत नसल्याने अनेक शिक्षकांचे अर्थचक्र बिघडते. शासनाच्या नियमानुसार कर्मचाºयांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे; परंतु आश्रम शाळेतील कर्मचाºयांचे, मार्च, एप्रिल अशा दोन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाºयांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाºयांना गृहकर्ज, विमा हप्ते, आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत.
आश्रमशाळेतील कुठल्याच कर्मचाºयांचे वेतन प्रलंबीत ठेवल्या जात नाही. या कर्मचाºयांचे झिरो बजेटवर वेतन निघत नाही. त्यामुळे सध्या आर्थिक बजेट नसल्याने वेतन थकले. मात्र दोन दिवसात वेतन प्रक्रिया पूर्ण होईल.
-डॉ. अनिता राठोड,
सहा. आयुक्त समाजकल्याण, बुलडाणा.