शेतरस्ता खुला करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:38 AM2021-08-12T04:38:40+5:302021-08-12T04:38:40+5:30
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड ते मलगदेव शिवारात आहेत. शेतात ...
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड ते मलगदेव शिवारात आहेत. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पळसखेड ते सिंदखेडराजा असा पांदण रस्ता पूर्वापार अस्तित्वात होता. परंतू सध्या सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम करतेवेळी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही नोटीस न बजाविता बंद करण्यात आलेला आहे. तसेच दुसरा अस्तित्वात असलेला पळसखेड ते नसीराबाद हा रस्तासुद्धा बेकायदेशीररीत्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हा सोयीचा रस्ता अस्तित्वात असतानासुद्धा हा रस्ता बंद झाल्यामुळे सात ते आठ किलोमीटर फेऱ्याने जाऊन येऊन जमिनी कसाव्या लागत आहेत. तरी ही बाब खर्चिक असून, वेळखाऊसुद्धा आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन हा रस्ता खुला करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर भास्कर कचरूबा वाहूळ, वसंत कचरूबा वाहूळ, दामोदर भाऊराव भुतेकर, गजानन भुजंगराव भुतेकर यासह बहुतांश शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे़