आव्हा-दहिगाव रस्त्याचे डांबरिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:27+5:302021-02-07T04:32:27+5:30
आव्हा ते दहिगाव रस्त्याची मागणी शुभम घोंगटेसह अनेक नागरिकांनी खा. प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती. दरम्यान, पहिल्यांदाच आव्हा-दहिगाव ...
आव्हा ते दहिगाव रस्त्याची मागणी शुभम घोंगटेसह अनेक नागरिकांनी खा. प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती. दरम्यान, पहिल्यांदाच आव्हा-दहिगाव रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दहिगाव हे गाव विदर्भ आणि खान्देशच्या सीमेवर असून, आतापर्यंत हे गाव मुख्य रस्यापासून वंचित होते. त्यामुळे खा. जाधव व आ. गायकवाड यांनी पुढाकार घेऊन तांत्रिकदृष्ट्या अडचणी सोडवून रस्ता हा तत्कालीन बांधकाम मंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजूर करून घेतला. या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग ९९ म्हणून मंजुरात मिळवून दिली. या कामासाठी निधी मंजूर करून १३ जानेवारीपासून रस्ता डांबरीकरण करून पूर्णत्वास नेला. या रस्त्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळणार असून, विदर्भ आणि खान्देशमध्ये जाण्याकरिता सोयीस्कर झाला आहे.