मतीमंद मुलीचा विनयभंग, आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास
By संदीप वानखेडे | Published: December 19, 2023 07:11 PM2023-12-19T19:11:45+5:302023-12-19T19:12:59+5:30
दाेन हजार रुपये दंडही : बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
संदीप वानखडे, बुलढाणा: तालुक्यातील एका गावातील मतीमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकणी आराेपीस चार वर्ष सश्रम कारावास आणि दाेन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायानिध आर.एन. मेहरे यांनी १९ डिसेंबर राेजी सुनावली़ नितीन प्रेमसिंग राठाेड असे आराेपीचे नाव आहे़
बुलढाणा तालुक्यातील एका गावातील मतिमंद मुलगी १ ऑगस्ट २०२० राेजी मतीमंद मुलगी शाैचास जात असताना आराेपी नितीन प्रेमसिंग राठाेड हा तेथे गेले़ त्याने मतीमंद मुलीचा विनयभंग करून तेथून पळून गेला़ घरी आल्यानंतर पिडीत मुलीने ही घटना काकुला सांगितली तसेच दुसऱ्या दिवशी आपल्या आईला सांगितली़ पिडीतेच्या आईने ३ ऑगस्ट २०२० राेजी बुलढाणा ग्रामीण पाेलिसात तक्रार दिली हाेती़ पाेलिसांनी या तक्रारीवरून आराेपी नितीन राठाेडविरुद्ध विनयभंगासह पाेक्साेनुसार गुन्हा दाखल केला हाेता़ या प्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक सुनील दाैड यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले़ न्यायालयात सरकारी वकील अॅड़ संताेष खत्री यांची नियुक्ती करण्यात आली़
सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले़ दाेन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायानिध आर.एन. मेहरे यांनी आराेपी नितीन राठाेड यास दाेषी ठरवले़ तसेच कलम ३५४ मध्ये ४ वर्ष कठाेर शिक्षा व दाेन हजार रुपये दंड ठाेठावला़ तसेच पिडितेला नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रकरण विधी सेवा प्राधीकरण यांच्याकडे पाठवण्याचा आदेश दिला़