महिला विधी अधिकाऱ्यास मारहाण
By सदानंद सिरसाट | Published: September 18, 2023 07:37 PM2023-09-18T19:37:26+5:302023-09-18T19:37:39+5:30
तक्रारीवरून आरोपी पती-पत्नी, मुलासह एका वृद्धेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खामगाव (बुलढाणा) : महिला विधी अधिकारी घराच्या अंगणात असताना त्यांच्या अंगावर पाणी फेकून मारहाण केल्याची घटना नांदुरा शहरातील पेठकर गल्लीत सोमवारी सकाळी ८ वाजता घडली. याप्रकरणी तक्रारीवरून आरोपी पती-पत्नी, मुलासह एका वृद्धेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी विधी अधिकारी रंजना पेठकर (३२) यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये त्या अंगणात पाणी तापवत असताना आरोपी साधना आत्माराम पेठकर यांनी त्याच्यावर पाणी फेकले. त्यांना पाणी फेकू नका, असे म्हटले असता प्रशांत आत्माराम पेठकर यांनी मारहाण केली. तर, दुर्गा प्रशांत पेठकर, आदित्य प्रशांत पेठकर यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३५४,३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीट नापोका वराडे करीत आहेत.