मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्वपदाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 04:11 PM2020-10-07T16:11:16+5:302020-10-07T16:11:36+5:30

Poperty Deal in Buldhana District दुय्यम निबंधक विभागाला पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Assets purchase and sale transactions toward boom in Buldhana | मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्वपदाच्या दिशेने

मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार पुर्वपदाच्या दिशेने

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एप्रिलमध्ये जवळपास ठप्प झालेले व १७ मे नंतर अंशत: सुरू झालेल्या मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार आॅक्टोबर महिन्यात पुर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत असून गेल्या तीन महिन्यात या व्यव्हारापोटी दुय्यम निबंधक विभागाला पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, एप्रिल-मे महिन्यातील व्यवहारांची तुलना करता जवळपास ७९ टक्क्यांनी व्यवहार वाढल्याचे चित्र आहे.
राज्यात मार्च अखरे लॉकडाऊन सुरू झाले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या उदिष्टाच्या तुलनेत अवघे ०.१९ टक्के रक्कम मुद्रांक शुल्क नोंदणीपोटी मिळाली होती. तर एकूण उदिष्ठाच्या ८.४८ टक्के रक्कम मे महिन्या अखेर मिळाली होती. त्यानंतर जस जसे मिशन बिगीन अगेनचे टप्पे सुरू होत गेले तसतसे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पुर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला.
गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराच्या मुद्रांक नोंदणी प्रकरणी १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उदिष्ठ देण्यात आले होते. त्याच्याशी तुलना करता आॅगस्ट महिन्यात ४७ टक्क्यार्पंत हे उत्पन्न वाढलेले आहे. चालू आर्थिक वर्षाचे उदिष्ठ मात्र अद्याप मिळालेले नाही.
एकंदरीत मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार हे आता सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी या क्षेत्रात आता आर्थिक उलाढाल वाढू लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेले हे व्यवहार आता या क्षेत्रात तेजी आणत आहेत. लॉकडाऊनच्या परमोच्च काळात जेथे बुलडाणा दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल-मे महिन्यात मुद्रांक नोंदणीपोटी अवघे एक कोटी १५ लाख ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते तेथे आॅगस्ट अखेर पाच कोटी ३८ लाख ७२ हजार ७१० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अर्थात लॉकडाऊनच्या दोन महिन्याच्या कालावधीत अवघे २१ टक्के उत्पन्न मिळाले होते तेथे आॅगस्ट अखरे त्याच्या चारपट उत्पन्नमालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारातून मिळालेले आहे. ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक आनंददायी बाब म्हणावी लागले.

Web Title: Assets purchase and sale transactions toward boom in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.