जाणीव फाउंडेशनकडून नित्यानंद बालनिकेतन प्रकल्पाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:40 AM2021-09-14T04:40:56+5:302021-09-14T04:40:56+5:30
जि. प. शिक्षक अनंत शेळके यांनी एका भाड्याच्या खोलीत १५ मार्च २००९ रोजी ५ गरजू मुलं दत्तक घेऊन ...
जि. प. शिक्षक अनंत शेळके यांनी एका भाड्याच्या खोलीत १५ मार्च २००९ रोजी ५ गरजू मुलं दत्तक घेऊन या निरपेक्ष सेवा कार्याला सुरुवात केली होती. अनंत शेळके यांनी दोन वर्षांनंतर प्रकल्पाचे स्थलांतर राहत्या घरी केले. सध्या स्थितीत ३५ मुले तिथे निवासी असून, निवास भोजन, ट्युशन, सर्व सुविधांचा आनंद घेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण घेत आहेत. अकरा वर्षांच्या प्रवासात विद्यार्थ्यांच्या सानिध्यात घडलेली ४३ विद्यार्थी शासकीय सेवेत असून, तेच विद्यार्थी आता या सेवा कार्यात आपल्या समिधा अर्पण करून हा सेवा यज्ञ प्रदीपत ठेवत आहेत. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दानशूर दातेदेखील स्वयंप्रेरणेने या सत्कार्याला सहृदयतेने बळ देत आहेत. नित्यानंद बालनिकेतन सेवाप्रकल्पाला जाणीव फाउंडेशन कडून मदत देण्यात आली. यावेळी जाणीव कडून अभिजीत वाघमारे, गणेश वाघ, संतोष डिघे, विशाल इंगळे, विनोद ठाकरे, ज्ञानेश्वर संबारे, रोशन तायडे, गजानन मिरगे, विजय पाचपोर, अमोल कीरोचे, सचिन ढोन, आकाश भंडारे, भिकुलाल झंवर, सुमित्रा झंवर, अलकनंदा परीहार, दीपाली सोनोने, मनोज यादव, प्रांजली धोरण यांच्यासह अंनत शेळके आदी उपस्थित होते.
अशी दिली मदत जाणीव फाउंडेशन च्या वतीने नित्यानंद बालनिकेतन सेवा संकल्पला १०० किलो गहू, ६० किलो तांदूळ, बिस्कीट, चॉकलेट, वह्या-पुस्तके, साबण ब्रश, पेस्ट, कलर बॉक्स आदी गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले.