नित्यानंद सेवा प्रकल्पाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:24 AM2021-06-25T04:24:29+5:302021-06-25T04:24:29+5:30
त्यांनी हिवरा आश्रम येथील वंचित मुलांच्या नित्यानंद परिवाराला इन्व्हर्टर, तीन पोते गहू व एक महिन्याचा किराणा मालाची मदत केली. ...
त्यांनी हिवरा आश्रम येथील वंचित मुलांच्या नित्यानंद परिवाराला इन्व्हर्टर, तीन पोते गहू व एक महिन्याचा किराणा मालाची मदत केली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनाच्या महामारीत जग स्वसंरक्षणार्थ आत्मकेंद्रित झाले असताना, वंचित मुलांच्या संगोपनासाठी महा दातृत्वाच्या समिधा अर्पण करत नित्यानंद परिवाराचा सेवायज्ञ कायम ठेवण्याची स्वयंस्फूर्त सामाजिक बांधीलकी कृतिशील दातृत्वाने प्रकट झाली. यावेळी पं.स.सदस्य शिवप्रसाद मगर, अमोल म्हस्के, संजय केंदळे, गजानन दळवी, समाधान मस्के, विशाल परिहार, ग्रा.पं.सदस्य प्रशांत बोरे, योगेश देशमुख, समाधान बनसोडे, गजानन कंकाळ, राज वडतकर, महेश लोढे, बाप्पू कांबळे, मुरलीधर गारोळे, समाधान पवार व इतर युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनंत शेळके यांनी आभार मानले. रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाहीत व नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्यासाठी घालणारा बाप माणूसदेखील आपल्यामध्ये असतो. अशा या परिवाराला आज मला मदत करता आली, हे माझे भाग्य आहे. संजय वडतकर, जिल्हा परिषद सदस्य, देउळगाव माळी.