वारी येथील वान नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 12:43 PM2021-08-22T12:43:27+5:302021-08-22T17:42:59+5:30

youth was swept away in the Wan River : अनिल रामकृष्ण सरोकार,(२४, रा, खांडवी ता, जळगाव जामोद) असे या युवकाचे नाव असून, तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते.

Atempt to take a selfie, the youth was swept away in the Wan River | वारी येथील वान नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

वारी येथील वान नदीत वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

तेल्हारा/संग्रामपूरः वारी भैरवगड येथील वान नदीपात्रात शनिवारी वाहुन गेलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात आढळून आला. अनिल रामकृष्ण सरोकार,(२४, रा, खांडवी ता, जळगाव जामोद) असे या युवकाचे नाव असून, तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते.

जळगाव जा. तालुक्यातील खांडवी येथील अनिल रामकृष्ण सारोकार हा युवक शनिवारी सेल्फी काढण्यासाठी वान नदीपात्रात उतरला होता. सेल्फी काढत असतानाच त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून वाहून गेला आहे. हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वाहन नदीला प्रचंड पूर आला होता. पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला. याबाबत नातेवाईकांनी रविवारी रोजी सोनाळा पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोनाळा पोलिसांकडून नदी पात्रात वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात या युवकाचा मृतदेह आढळून आला.

Web Title: Atempt to take a selfie, the youth was swept away in the Wan River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.