शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:57 PM2017-12-06T23:57:06+5:302017-12-06T23:59:30+5:30

शेगाव येथील केवलराम रामेश्‍वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका  भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे  काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली.

'ATM' removes mutual funds! | शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा!

शेगाव येथे ‘एटीएम’मधून परस्पर रक्कम काढून केला पोबारा!

Next
ठळक मुद्देकेवलराम रामेश्‍वर पंपाजवळील एसबीआयचे एटीएमएका वृद्धास पैसे काढून देतो असे सांगून पळवली रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील केवलराम रामेश्‍वर पंपाजवळ एसबीआयच्या एटीएम मधून एका  भामटयाने एका वृध्दाजवळून एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून परस्पर पैसे  काढून पोबारा केल्याची घटना बुधवारी दुपारी २.५५ वाजता घडली. 
 शेषराव मोतीराम पाटील (वय ८१) रा.पवनगीरी, रोकडीयानगर शेगाव हे बुधवारी  दुपारी  एटीएम मधून पैसे काढण्यास गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मी पैसे  काढून देतो माझ्याकडे तूमचे एटीएम द्या असे म्हणून त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे  काढले व तेथून पोबारा केला.  तर जातांना त्याने त्या वृध्दाला दुसरेच एटीएम कार्ड दिले. आपली फसवणूक  झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली  असून त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द अप.क्रं.५२१/१७  कलम ४२0 भादंविअन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एएसआय दगडू मोहाडे हे करीत आहेत. शहरात एटीएमवरील  सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

Web Title: 'ATM' removes mutual funds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.