एटीएम फोडणाऱ्या टाेळीचा छडा; दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:35 AM2021-08-15T04:35:47+5:302021-08-15T04:35:47+5:30

विशेष म्हणजे एटीएम फोडणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान बुलडाणा पोलिसांनी लिलया पेलत अशक्यप्राय वाटणारा हा गुन्हा उघडकीस आणला ...

ATM smash hitter; Two accused arrested | एटीएम फोडणाऱ्या टाेळीचा छडा; दोन आरोपींना अटक

एटीएम फोडणाऱ्या टाेळीचा छडा; दोन आरोपींना अटक

googlenewsNext

विशेष म्हणजे एटीएम फोडणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान बुलडाणा पोलिसांनी लिलया पेलत अशक्यप्राय वाटणारा हा गुन्हा उघडकीस आणला आहे. ३० जुलै रोजी चिखली तालुक्यातील शेलूद उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील स्टेट बँकेचे तीन एटीएम फोडून त्यातील ५६ लाख रुपयांची रोकड लंपास करीत पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे केले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर सेलसह एकूण पाच पथके स्थापन केली होती. गोपनीय माहिती व अमरावती परिक्षेत्र आणि मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूरपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा छडा पोलिसांनी लावला. त्यानंतर पोलिसांच्या राष्ट्रीय स्तरावरील गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अनुषंगिक गुन्ह्यासंदर्भाने काही दुवे पोलिसांना मिळाले. त्या आधारावर स्थापन करण्यात आलेल्या पाच पथकांनी तब्बल सात दिवस राजस्थानमध्ये तळ ठोकत या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, गॅस सिलिंडर, दोन ऑक्सिजन सिलिंडर आणि सहा मोबाईल जप्त केले. सोबतच राजस्थानमधील नरेश चौधरी (रा. अजारका, जि. अल्वर) आणि आसामचा नागरिक असलेल्या परंतु अजारका परिसरातच राहणाऱ्या कमरूल इस्लाम अब्दुल गणी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून काही हत्यारेही १० ते १२ ऑगस्टदरम्यान जप्त केली. अटक करण्यात आलेल्या या आरोपींना १३ ऑगस्ट रोजी चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर हे करीत आहेत.

- कारवाईत यांचा होता सहभाग -

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, हेमराजसिंग राजपूत, एसडीपीओ दीपक बरकते, अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बळिराम गिते, सायबर सेलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, विजय मोरे, एपीआय विलासकुमार सानप, मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अमलदार गजानन आहेर, शरद गिरी, पंकज मेहर, विजय सोनोने, गजानन गोरले, विजय वारूळे, शत्रुघ्न शिंदे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, उषा वाघ यांनी सहभाग घेतला होता.

- तांत्रिक कौशल्य लावले पणाला--

सायबर सेलची हा गुन्हा उघड करण्यात महत्त्वाची भूमिका राहिली. गुन्हा घडला त्या काळातील मोबाईलवरील जीपीएस लोकेशन, तब्बल २५० ठिकाणचे तपासण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज आणि अल्वर जिल्ह्यात संदिग्धांचा वावर असलेल्या गावांमध्ये गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी या पथकांनी केलेली पायपीट याच्या जोरावर या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Web Title: ATM smash hitter; Two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.